एचएमडी ग्लोबलचा स्मार्टफोन

‘एचएमडी ग्लोबल’ कंपनीने नोकिया ‘जी 42 5 जी’ हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 12,599 रुपये आहे. नोकिया जी 42 स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5 जी चिपसेटसह येईल. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्यायात येतो. या फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असेल. फोनचा रिफ्रेश रेट 90 हर्टझ आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन सह येईल. हा फोन अँड्रॉईड 13 आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. हा फोन दोन वर्षांच्या ओएस अपग्रेडसह येईल.

फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय 2एमपी डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 2एमपी मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर विक्रीसाठी 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध करून दिला जाईल. हा फोन जांभळ्या आणि राखाडी रंगामध्ये असेल. या फोनमध्ये 8 एमपी फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, फोन 5000 एमएएच बॅटरी सपोर्टसह येईल. हा फोन 20 वॉट वायर्ड चार्जसह येईल. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये 90 हर्टझ रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये येतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5050 एमएएचबॅटरी दिली जाईल. तर 50 एमपी कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *