गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची मार्गिका सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची एक मार्गिका मंगळवारी सुरु झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या मार्गिकेचे उद्घाटन झाले. गणेशोत्सवापूर्वी अगदी कमी कालावधीत ही मार्गिका सुरु करणे एक आव्हान होते. मात्र, कर्मचारी, अधिकारी आणि तंत्रज्ञ यांच्या प्रामाणिक आणि अविरत कष्टांमुळेच हे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले, असे ते म्हणाले.

एकूण दोन किलोमीटरचा हा बोगदा आहे. बोगद्याला जोडलेले रस्ते धरुन हा नऊ किलोमीटरचा मार्ग आहे. या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात कापता येईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. आधी या अंतरासाठी पंचेचाळीस मिनिटे वेळ लागत असे. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गाच्या एकेरी मार्गिकेचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. गणेशेत्सवापूर्वी या मार्गावरुनही वाहतूक सुरू होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *