ॲपलने आपल्या यूजर्ससाठी ‘आयफोन 15’ ची सिरीज लाँच केली आहे. आयफोनच्या आधीच्या सीरिजबाबत वापरकर्त्यांची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. या सीरिजची किंमत अनेक युजर्सच्या बजेटबाहेर राहिली आहे. अशा परिस्थितीत यूजर्स आयफोन 15 च्या सिरीजवर लक्ष ठेवून आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरील सेलदरम्यान आयफोनची किंमत खूपच कमी होणार आहे. त्यामुळे कमी किंमतीत नवीन चमकणारा आयफोन खरेदी करु शकता.
सिरीजच्या सुरुवातीच्या किंमतीबद्दल बोलायचे तर ते 69,900 रुपयांपासून सुरू होते. हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फिलपकार्टवरून 61,999 रुपयांच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता. त्याच वेळी, सेलमध्ये हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवर 8 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होणार आहे.
आयफोन 14 ची सुरुवातीची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती मिळाली आहे. आयफोन 14 ची सुरुवातीची किंमत देखील फ्लिपकार्टने विक्रीपूर्वीच मंजूर केली आहे. आयफोनच्या किंमतीबाबत दिलेल्या या संकेतानंतर असे मानले जात आहे, की कंपनी 49,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करण्याची संधी देऊ शकते. याआधी आयफोन 12 च्या किंमतीबाबत माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये, ग्राहक 32,999 रुपयांमध्ये आयफोन 12 विकत घेऊ शकतील. हा सेल 8 ऑक्टोबरपासून सामान्य वापरकर्त्यांसाठी सुरू होत आहे.