नव्याकोऱ्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! ‘एकदा येऊन तर बघा’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधणारे विनोदवीर २४ नोव्हेंबरला या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अभिनेता प्रसाद खांडेकर यांना ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची संधी मिळाली आहे. दिग्गज विनोदी कलाकार असलेल्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित गिरीश कुलकर्णींच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे . याशिवाय ओंकार भोजने व प्रसाद खांडेकर त्यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव चित्रपटात तेजस्विनीची बहीण असल्याचं टीझरमधून स्पष्ट होतं. हे कुटुंबीय मिळून नवंकोरं हॉटेल सुरू करतात. परंतु, नव्या हॉटेलमध्ये अतरंगी पाहुण्याची एन्ट्री झाल्यावर गोष्टी बदलतात याचा आनंद प्रेक्षकांना २४ नोव्हेंबर रोजी घेता येईल.