जिओचा प्राईमा ४ जी फोन

जिओने आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्मार्ट फीचर फोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीने ‘भारतीय मोबाइल काँग्रेस इव्हेंट’ मध्ये वापरकर्त्यांसाठी नवीन फोन जिओ फोन ‘प्राईमा ४ जी’ प्रदर्शित केला. वापरकर्त्यांसाठी आणले जाणारे हे नवीन जिओ डिव्हाइस एक फीचर फोन आहे. या फोनमध्ये यूजर्स व्हॉट्सअॅप आणि यूट्यूबचाही वापर करू शकणार आहेत. हा फोन 23 भाषांना सपोर्ट करेल. जिओचा नवीन फोन प्रीमियम डिझाइन आणि जिओ लोगोसह आणला जात आहे. फोन लाँच होण्याआधीच त्याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

हा फोन प्रोसेसर ‘एआरएम कॉर्टेक्स ए ५३’ सह आणला जात आहे. फोनचा डिस्प्ले 2.4 इंच आहे. रॅम आणि स्टोरेज 128 जीबी वाढवता येण्याजोगे आहे. फोन 512 एमबी रॅमसह आहे. जिओचे नवीन उपकरण 0.3 एमपी कॅमेऱ्यासह आणले जात आहे. या फोनची बॅटरी 1800 एमएएच एवढी आहे. ग्राहक हा फोन यलो आणि ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतील.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *