मुक्ता आणि सागर एकत्र येणार

 

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा एक प्रोमो काही तासांपूर्वी समोर आला आहे. तो पाहून मुक्ता-सागरमध्ये मैत्री होणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिली आहे. सध्या सागरची मुलगी सई ही सावनीकडे म्हणजेच तिच्या आईकडे राहत आहे. सागर सईला परत आणण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करीत आहे. सागरला हरवण्यासाठी हर्षवर्धन आणि सावनीला सईची कस्टडी हवी असते. दरम्यान, सई तिच्या आईकडे आनंदी राहील, म्हणून मुक्ता कोणतीही चिंता न करता सईचा हात सावनीच्या हातात देते. जेव्हा मुक्ता सावनीच्या घरी जाते, तेव्हा तिला सावनी खरी कशी आहे याचा अंदाज येऊ लागतो, हे सध्या दाखवत आहेत.

मालिकेतील मुक्ता आणि सागर एकमेकांचे शेजारी असूनही त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच वाद दाखवण्यात आले आहेत. नव्या प्रोमोत त्यांच्यात मैत्री होण्याची शक्यता दाखविली आहे. मुक्ता सईसाठी सागरला मदत करताना दिसेल. सावनीचा खरा स्वभाव समजल्यामुळे कदाचित मुक्ता सागरची मदत करीत आहे. आता मुक्ता नेमकी मदत का करते, सागर तिला कशी प्रतिक्रिया देतो, हे आगामी भागात दिसेल. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *