विकी कौशल पुन्हा एकदा लष्करी अधिकारी

 

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातून विकी कौशलने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता तो भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. एका वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा असणाऱ्या बॉलीवूड प्रोजेक्ट्सपैकी हा चित्रपट आहे. विकी कौशल पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विकीचा नवा लूक आणि चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅमबहादूर’ ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. ‘राझी’नंतर मेघना आणि विकीचा हा दुसरा चित्रपट आहे.

चित्रपटाचा टीझर दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये केवळ विकीच नाही तर चित्रपटाच्या कथेची काही झलकही दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये विकी गंभीर लूक देताना दिसत आहे. त्यांच्यामागे अनेक सैनिक आहेत. ‘जिंदगी हिसी, इतिहास हमारा’ ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ही प्रदर्शित होत आहे. सान्या मल्होत्रा विकीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *