सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • छापखाना व्यवसाय

छापखाना व्यवसाय

by सह्याद्री मराठी वृत्त 2 November 2023 0 Comments
02Nov, 2023

‘प्रिंटिंग प्रेस’ म्हणजे सर्व प्रकारच्या कागदांवर मजकूर छापण्यासाठीचा छापखाना. हा व्यवसाय वर्षभर चालणारा असतो. वर्षभर अनेकजण लग्नपत्रिका, कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका, दिनदर्शिका, पुस्तके, वह्या इत्यादी प्रकारच्या वस्तुंची छपाई करुन घेत असतात. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, जागा आणि इमारतीची संपूर्ण किंमत यावर हा व्यवसाय किती मोठा आहे हे ठरवले जाते. ग्रामीण भागात हा व्यावसाय लहान स्वरुपाचा असतो, तोच महानगरांमध्ये मोठ्या स्वरुपात असतो. हा व्यवसाय लहान आणि मोठा अशा दोन स्वरूपात सुरू करता येतो. यासाठी छपाई यंत्रे असावी लागतात.

छोट्या यंत्रावर तासाला चारशे ते पाचशे नमुने छापता येतात. नवउद्योजकांना आणि बेरोजगारांना ग्रामीण भागात कमी भांडवलात उद्योग सुरू करण्यासाठी लहान प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय फायदेशीर आहे. ग्रामीण भागातील पोस्टल संस्था, ग्रामपंचायती, दुग्धव्यवसाय आणि सोसायट्यादेखील मोठ्या प्रमाणात मुद्रण केंद्रांचा वापर करतात. त्यांना हवी असलेली स्टेशनरी छापून १२ महिन्यांत दिली जाऊ शकते. यासोबतच लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, लिफाफे, हँडबिल्स आदी स्टेशनरी छापून व्यावसायिकांना देता येते. यासह बिल-पुस्तके, ग्रामीण भागातील लोकांसाठी निमंत्रण पत्रिका, विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींसाठी पेपर पॅम्प्लेट्स इत्यादींची छपाई सातत्याने होत असते.

बेरोजगार तरुणांसाठी हा चांगला व्यवसाय आहे. कमी स्पर्धेमुळे उद्योगात व्यावसायिक फसवणूक कमी होते. जर तुम्ही उद्योग सुरू करणार असाल तर जवळपास एखादी औद्योगिक वसाहत असेल, शहरीकरण असेल, बाजारपेठ असेल, शोरूम्स, मॉल्स, दुकाने असतील किंवा शाळांसारख्या अनेक शैक्षणिक संस्था असतील तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करावा. तुम्ही एक ते दोन लाखांच्या भांडवलात अशी प्रेस सुरू करू शकता. परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्या प्रमुखांना भेटा. विविध नमुन्यांची स्टेशनरी छापून त्यांना हवे ते द्या. दुग्धव्यवसाय, सोसायट्या, पतसंस्था, महिला मंडळे, बचत गट, भिशी मंडळे, संस्था, ट्रस्ट यांच्या प्रमुखांना भेटून त्यांच्या छपाईचे काम घेऊ शकता. लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका आणि व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी स्वत:च्या या व्यवसायाची जाहिरात करा.

स्वत: स्थानिक व्यावसायिकांना भेटून स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड, हँडबिल आणि पावती पुस्तकांच्या छपाईसाठी ऑर्डर मिळवा. तुमच्या प्रेसजवळच्या औद्योगिक वसाहतींना भेट द्या. कंपनीच्या किंवा कारखान्याच्या विभागप्रमुखांना भेटा. त्यांच्या कारखान्याचे छपाईचे काम मिळवा. या व्यवसायात रबर शीट, चांगल्या दर्जाची रंगीत शाई, छोटी-मोठी साधने – जसे की हातोडा, कंपोझिंग स्टिक, गोंद, चिकट डिंक, लेटर प्रेस, ऑफसेट, बांधणी मशीन, प्रेस मशीन, कटिंग मशीन, पोर्टेटिंग सारखी यंत्रसामग्री आवश्यक असते. एखाद्या छापखान्यात काही दिवस काम करुन आपण यातील अनुभव घेऊ शकता. सुरुवातीला स्वत:ला पेलेल एवढे काम घेऊन ते इमानेइतबारे करावे. आपला व्यवसाय चांगली कमाई करुन देत असल्याचे लक्षात आल्यावर आपल्या आवाक्यात कामगार घेऊन काम करावे. यामुळे काम वाढून व्यवसायातही समृद्धी साधता येईल.

Next
यशस्वी उद्योजक होण्यासाठी
November 2, 2023
Previous
बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र
November 2, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to छापखाना व्यवसाय?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !