ओले आले

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘ओले आले’ असे असून चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर प्रदर्शित करण्यात आले आहे. आता नाना आणि मकरंद यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक नसतील, तर नवलच ! ‘ओले आले’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करीत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीत अलीकडे काहीसे हटके आणि नवनवीन विषय हाताळणारे चित्रपट बनत आहेत. तसाच हा एक आगळा चित्रपट आहे. ‘ओले आले’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव नौकाविहार करताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या कॅप्शनमध्ये ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ ही ओळ दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *