सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • वीज जोडणी सामग्री निर्मिती

वीज जोडणी सामग्री निर्मिती

by सह्याद्री मराठी वृत्त 9 November 2023 0 Comments
09Nov, 2023

आपल्या देशात अनेक कारणांसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मागणीनुसार पुरवठा होत नसला तरी वीज जोडणी साहित्याला मोठी मागणी असते. विजेचा वापर करून अनेक उत्पादने तयार केली जातात. आता अगदी ग्रामीण भागातही वीज पोहोचली आहे. पारंपरिक वीज निर्मितीबरोबरच विजेची मागणीही दिवसेंदिवस वाढत असल्याने अपारंपरिक स्रोतांपासून वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प आपल्या देशात सुरू होत आहेत. नदीवर बंधारे बांधून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याने सरकारने अशा खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांना परवानगी दिली आहे. पवनचक्क्या, अणुऊर्जा तसेच कारखान्यातील टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती करता येते. विविध विद्युत उपकरणांमध्ये वीज जोडणी करावी लागते. त्याचप्रमाणे कंपन्या, कारखाने आणि मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, कंपन्या, कारखाने देखील पंखे, ट्यूबलाइट, एअर कंडिशनर, कुलर, फ्रीजशिवाय अनेक कामांसाठी वीज वापरतात. विजेचा प्रवाह या उपकरणापर्यंत वाहून नेण्यासाठी विद्युत वाहक आणि वेष्टनबंद तारा असलेल्या साहित्याने जोडणी करावे लागते. अशा वीज जोडणीचे साहित्य बँकेलाइटच्या इन्सुलेट प्लास्टिकपासून बनविले जाते.

प्लास्टिकच्या पट्ट्या, पाईप्स, बटणे, होल्डर, स्विचेस, जोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिना यांसारख्या वस्तू तयार करण्यासाठी साच्याचा वापर करावा लागतो. प्लास्टिक वितळवून ते साच्यामध्ये ओतले जाते. असे साचे कार्बन स्टीलपासून तयार केले जातात. अशा वीज जोडणी सामग्रीमध्ये स्वीच बोर्ड किंवा लाईट बटणे, स्प्रिंग्स, पिन आणि स्क्रू असतात. पितळ धातूपासून बनविलेल्या अशा वस्तू प्लास्टिकच्या उपकरणांमध्ये हँड प्रेस मशीन किंवा हाताने ठेवल्या जातात. वीज जोडणीसाठी साहित्य तयार करताना उच्च दर्जाचे साहित्य वापरावे. विजेच्या धक्क्याने मनुष्य जखमी होण्याची शक्यता असल्याने अशा वस्तू बनवताना लोभापोटी कमी दर्जाच्या वस्तू बनवू नयेत. आजचे ग्राहक स्मार्ट आणि हुशार असल्याने तुमचा ब्रँड आणि त्या वस्तूंची सुरक्षितता तपासल्यानंतरच ते अशा वस्तू खरेदी करतात. तुम्ही उच्च दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करून तुमच्या विशिष्ट नावाचा ट्रेडमार्क आणि ब्रँड तयार करू शकता.

दिवसेंदिवस वीज जोडणी साहित्याची मागणी वाढत असल्याने नवीन उद्योजकांनी तांत्रिक प्रशिक्षण घेऊन उत्पादन सुरू केले, तर भविष्यात उत्पादन व विक्रीचा विस्तार वाढेल. प्रत्येक घरात वीज जोडणी करणे आवश्यक असते. एकदा वीज जोडणी झाल्यावर कधीतरी वीज सामग्रीची छोटी-मोठी दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे वीज जोडणी सामान खरेदी करण्यासाठी ग्राहक वारंवार येण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनाला ब्रँडेड बनवा. मोठ्या उंच इमारतींना जास्त प्रमाणात वीज जोडणी सामग्रीची आवश्यकता असते. एकदा व्यवसायास सुरुवात केल्यावर आपण बांधकाम व्यावसायिक, अभियंते, कंत्राटदार यांना भेटू शकता. त्यांना आवश्यक दर्जाचे साहित्य पुरवू शकता.

वीज जोडणीचे साहित्य विकणारे घाऊक व्यापारी असतात. आपण त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन वस्तू वितरीत करू शकता. शहरात व खेड्यापाड्यातही इलेक्ट्रिकलची छोटी-मोठी दुकाने आहेत. आपण आपला माल थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात. या व्यवसायासाठी युरिया फॉर्मल्डिहाइड, फिनॉल फॉर्मलडीहाइड, बेकलाइट प्लास्टिक, स्प्रिंग्स, पिन, स्क्रू, लहान स्क्रू, नट इत्यादी कच्चा माल आवश्यक असतो. यांत्रिक मोल्डिंग प्रेस मशीन , कार्बन स्टील मोल्ड, हायड्रोलिक प्रेस मशीन किंवा हँड प्रेस मशीन इत्यादी यंत्रसामग्रीची आवश्यकता असते.

Next
बॉलपेन निर्मिती
November 9, 2023
Previous
नैसर्गिक शेती आणि देशी गुरे
November 9, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to वीज जोडणी सामग्री निर्मिती?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !