सॅमसंगचा मेगा इव्हेंट लवकरच होणार आहे. या इव्हेंटमध्ये ‘सॅमसंग गॅलॅक्सी एस २४’ ही सीरीज लाँच होईल. यासोबतच या कार्यक्रमात अनेक खास उत्पादने लाँच केली जाणार आहेत. हा इव्हेंट सॅमसंग गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेंट २०२४ म्हणून ओळखला जाईल. रिपोर्टनुसार, या इव्हेंटमध्ये ‘सॅमसंग गॅलॅक्सी रींग’ आणि ‘गॅलॅक्सी एआय’ सादर केले जाऊ शकतात.
‘सॅमसंग गॅलॅक्सी एस २४’ स्मार्टफोनमध्ये एआय सपोर्ट दिला जाऊ शकतो. गुगल पिक्सेल 8 मध्ये अशीच काही वैशिष्ट्ये देण्यात आली होती. तसेच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक रंजक फिचर्स सादर करता येतील. यावर्षी, गॅलॅक्सी एस 24 मालिका जानेवारी 2024 च्या मध्यात लाँच केली जाऊ शकते. हा सॅमसंगचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असेल, जो आयफोन 15 सीरीज आणि गुगल पिक्सेल 8 सीरीजशी स्पर्धा करेल. गॅलॅक्सी एस 24 प्लस, गॅलॅक्सी एस 24 अल्ट्रा या सीरीज अंतर्गत लॉन्च केले जाऊ शकतात. सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ अल्ट्रामध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली कॅमेरा सेंन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, सुधारित बॅटरी आयुष्यासह जलद चार्जिंग समर्थन प्रदान केले जाऊ शकते.