सॅमसंगचा गॅलॅक्सी एस २४

सॅमसंग आपला पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘गॅलॅक्सी एस २४’ सादर करणार असून यूजर्स या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सॅमसंगचे हे फोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस फोन्सच्या रूपात मार्केटमध्ये येऊ शकतात. सॅमसंग गॅलेक्सी एस 24 हा एक स्मार्टफोन असेल. ज्यामध्ये कंपनी अनेक एआय फीचर्स सादर करू शकते. गॅलॅक्सी एस 24 सिरीजमध्ये कंपनी तीन नवीन स्मार्टफोन्स ‘गॅलॅक्सी एस 24’, ‘गॅलॅक्सी एस 24+’ आणि ‘गॅलॅक्सी एस 24 अल्ट्रा’ सादर करू शकते. आगामी मालिकेच्या तिन्ही फोनमध्ये काही नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस वैशिष्ट्ये सादर केली जाण्याची अपेक्षा आहे.

सॅमसंगचा फोन एआय फोन म्हणून खास मानला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सॅमसंगने कंपनीचा इन-हाऊस व्हॉईस असिस्टंट बिक्सबी आणि इतर अनेक एआय फीचर्स दिले आहेत. या मालिकेत, पुढील वर्षी येणारे स्मार्टफोन मॉडेल जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वैशिष्ट्यांसह आणले जाण्याची अपेक्षा आहे.

वास्तविक, सॅमसंग आपला स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वैशिष्ट्यांसह सादर करण्याच्या तयारीत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यासोबत असे म्हटले आहे, की 2024 हे वर्ष गॅलॅक्सी एआयचे नवीन युग असेल. अहवालांवर विश्वास ठेवला, तर गॅलॅक्सी एस 24 मालिका 2024 मध्ये सादर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, आगामी मालिकेबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *