समुद्रातील द्वारका पाहण्याची सुवर्णसंधी

गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर पर्यटकांना दाखविणार आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी 300 फूट खालवर असलेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका नगरी शोधून काढली आहे. पाणबुडीच्या माध्यमातून ही सफर घडविली जाणार आहे. श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा दिवाळीपर्यंत द्वारका दर्शन सेवा सुरू करण्याचा गुजरात सरकार प्रयत्न करीत आहे.
गुजरात सरकाराने द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात ‘प्रवासी पाणबुडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पर्यटनासाठी भारत सरकारची कंपनी माझगाव डॉक शिपयार्डसोबत गुजरात सरकारने करार केला. जानेवारीतील व्हायब्रंट संमेलनात याबाबती अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राज्य पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव हारित शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.