हर्षदा खानविलकर पुनश्च सासू होणार

छोट्या पडद्यावर हर्षदा खानविलकर यांनी सासूची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. आता ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत ती पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याआधी ते ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या मालिकेत हर्षदा कठोर दिसतील का, प्रेमळ असतील हे कार्यक्रम सुरू झाल्यावर कळेल.

समाजमाध्यमावर जोडलेल्या ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या प्रोमोवर प्रेक्षकांनी शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला आहे. या मालिकेतही सासू-सुनेतील युद्ध पहायला मिळणार आहे का, असे प्रोमो पाहिल्यावर वाटते. रोहिणी निनावे यांनी या मालिकेची कथा आणि पटकथा लिहिली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *