आईच्या आठवणीत तेजश्री भावूक

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधान मुक्ताची प्रमुख भुमिका साकारीत आहे. तेजश्री ही अतिशय गुणी अभिनेत्री म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नोव्हेंबरमध्ये तेजश्रीच्या आईचे निधन झाले. तेजश्रीने समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये आईबाबांचे छायाचित्र जोडून आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात तेजश्रीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तेजश्रीला त्या दु:खातून बाहेर पडणे कठीण झाले होते.

तेजश्रीने छायाचित्रासोबत म्हटले आहे की, मला माहित आहे, तू तिथून मला पाहत आहेस. तू कायम माझ्याबरोबर आहेस हे मला ठाऊक आहे आणि याच विश्वासाने मी माझे यापुढचे संपूर्ण आयुष्य जगत राहणार आहे.” तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, “तुझ्या आईचे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत.” एका यूजरने “दगडापासून आपली मूर्ती घडवत असते, ती फक्त आणि फक्त आईच असते,” अशी कमेंट केली आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांचे त्यांच्या मुंबईतील घरी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *