सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • अंड्यांचे कागदी ट्रे

अंड्यांचे कागदी ट्रे

by सह्याद्री मराठी वृत्त 4 January 2024 0 Comments
04Jan, 2024

जागतिक स्तरावर ताज्या अंड्यांची मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या ट्रेचा वापरही वाढत आहे. म्हणून, अंडी ट्रेचे उत्पादन हा एक चांगला उद्योग म्हणून नावारुपास येत आहे. अंड्याचा कागदी ट्रे हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगली कार्यक्षमता असून त्याची उत्पादन किंमतही कमी आहे. कागदी अंड्याचे ट्रे उत्पादन या व्यावसायिक प्रकल्पात प्रगतीची व्यापक शक्यता आणि जास्त नफा आहे. अंड्याच्या कागदी ट्रेच्या कच्च्या मालामध्ये टाकाऊ ए4 पेपर, जुनी पुस्तके, मासिके, पुठ्ठा, वर्तमानपत्रे, टाकून दिलेले कागदी अंड्याचे ट्रे, विविध प्रकारचे प्लांट फायबर पल्प आणि इतर पुनर्वापर केलेल्या कागदापासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश होतो. हे सर्व सामान मिळणे सोपे असून त्यांच्या किंमतीही कमी आहेत. या ट्रेची उत्पादन प्रक्रिया सोपी आणि प्रदूषणमुक्त आहे. उत्पादन प्रक्रिया वेगवान आहे. एक लहान अंडी ट्रे बनविण्याचे यंत्र एका दिवसात एक टनापेक्षा जास्त अंड्याचे ट्रे तयार करू शकते.

कागदी अंड्याच्या ट्रेसाठी भांडवली गुंतवणूक तुलनेने कमी असून नफा जास्त आहे. उत्पादनाच्या मुख्य खर्चामध्ये वीज, पाणी, कच्चा माल, श्रम आणि देखभाल यांचा समावेश होतो. हे ट्रे तयार करण्यासाठी एक निश्चित अशी प्रक्रिया आहे. सर्वप्रथम, कामगार कागद हायड्रॉलिक पल्परमध्ये भरतात. कागदाचा लगदा तयार होईपर्यंत कागद ठराविक प्रमाणातील पाण्याने पल्परमध्ये घुसळला जातो. लगदा तयार झाल्यानंतर त्यामधील अशुद्धता काढली जाते. शुद्ध केलेला लगदा तात्पुरत्या साठवणुकीसाठी लगदा मोठ्या टाकीमध्ये नेला जातो. तेथे कागदाचा लगदा पल्प बीटर्सद्वारे एकसंध केला जातो. या प्रक्रियेत रंगद्रव्ये आणि इतर पदार्थ मिसळले जातात. आणि मग यंत्राद्वारे ट्रे तयार केले जातात.

कागदी अंड्याचा ट्रे सुकवण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. हे ट्रे तीन प्रकारे वाळवले जातात. या ट्रेंचे पूर्णपणे निर्जलीकरण केले जाते. ज्यामुळे मजबूतपणा येतो. ट्रे नैसर्गिकरित्या कोरडे करणे, वीटेवर कोरडे करणे आणि धातूवर कोरडे करणे असे तीन प्रकार आहेत. अंड्याचे ट्रे सूर्याखाली किंवा सामान्य तापमान असलेल्या खोलीत वाळवले जाणे म्हणजे नैसर्गिक वाळवणे होय. वीटेवर सुकणे म्हणजे हे ट्रे वीटभट्टीवर सुकवतात. नैसर्गिक वायू, कोळसा, डिझेल, लाकूड आणि इतर इंधनांचा उष्णता स्त्रोत वापर होतो. त्यावर अंड्याचे ट्रे वाळवले जातात. मेटल ड्रायिंग सिस्टीममध्ये प्रामुख्याने डिझेल, नैसर्गिक वायूचा वापर इंधन म्हणून केला जातो. त्यावर हे ट्रे वाळवतात. अंड्याचे कागदी ट्रे अँटी-स्टॅटिक, अँटी-कॉरोझन असून ते जलरोधक असतात. त्यांच्यात शॉक शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे अंड्यांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय हे ट्रे पर्यावरणपूरक असतात. प्रदूषण करीत नाहीत. त्यांचे पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते. त्याला ‘ग्रीन पॅकेजिंग’ म्हणतात.

या ट्रेच्या उत्पादन प्रक्रियेतही प्रदूषण कमी असते, किंवा प्रदूषण नसते. उत्पादनावेळी वापरलेले पाणी पुन्हा वापरले जाऊ शकते. शॉक शोषण कार्यक्षमता चांगली आहे.
अंड्याचे कागदी ट्रे पुनर्वापर करण्यायोग्य आणि पर्यावरणाला हानी न पोहोचविणारे असतात. अर्थात हा, उद्योग करण्यासाठी याचे प्रशिक्षण घ्यायला हवे. बाजारातील मागणी बघून आणखी कोणी हा उद्योग करतात का हे पहायला हवे. त्या उत्पादकांना मागणी आहे का ? असल्यास ती कशी आहे याचा अभ्यास करावा. आपल्या उत्पादनाची माहिती आपणच सर्वतोमुखी होईल, असे पहावे. यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करुन घ्यावा. अलीकडे आहारात अंड्यांचे महत्त्व वाढल्याने अंड्यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे अर्थातच हा व्यवसाय फायदेशीर आहे.

Next
प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण
January 4, 2024
Previous
महानायक अमिताभ भावूक झाले
January 3, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to अंड्यांचे कागदी ट्रे?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !