ॲथरची ४५० ॲपेक्स

नवीन वर्षाच्या निमित्ताने ‘ॲथर एनर्जी’ कंपनीने भारतीय ग्राहकांना उत्त्म भेट दिली आहे. सध्या बाजारपेठेत ‘ॲथर ४५० ॲपेक्स’ ही नवीन विद्युत स्कूटर लाँच केली आहे. ॲथरची ‘450 ॲपेक्स’ ही सर्वात शक्तीबाज इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ॲथरने ही इलेक्ट्रिक स्कूटर 1.89 लाख रुपये किंमतीला लाँच केली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज करून 157 किमी अंतर कापेल. ‘450 ॲपेक्स’ ला 40 ते 80 किमी/ताशी वेग येण्यासाठी कमी वेळ लागतो. याशिवाय, ही एथरची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जिचा कमाल वेग 100 किमी/तास आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.89 लाख रुपये आहे.

‘ॲथर 450’ ही ॲपेक्स 450 इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. स्कूटरच्या सीटची उंची, व्हीलबेस, टायरचा आकार आणि ग्राउंड क्लिअरन्समध्ये कोणताही बदल नाही. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन बेल्ट ड्राईव्ह सिस्टीम वापरण्यात आली आहे. ती अॅथरच्या इतर मॉडेल्समध्येही वापरली जाणार आहे. ‘450 ॲपेक्स’मध्ये 3.7 केडब्लूएच बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ‘450 एपेक्स’ इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 157 किलोमीटरचे अंतर कापेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *