पंच ईव्हीसाठी आरक्षण सुरू

टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयुव्ही ‘पंच ईव्ही’ ही भारतीय बाजारपेठेत लवकरच लाँच होण्याच्या तयारीत आहे. देशांतर्गत ऑटोमेकरने आगामी इलेक्ट्रिक एसयुव्हीसाठी २१,००० रुपयांच्या टोकन रकमेवर आरक्षण सुरू केले असून आता गाडीचे तपशील समोर आले आहेत. ‘टाटा पंच ईव्ही’ स्मार्ट, स्मार्ट प्लस, ॲडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड प्लस या पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

टाटा पंच ईव्हीला गरम फ्रंट सीट, ऑटो होल्डसह स्वयंचलित पार्किंग असेल. ही हरमन साउंड सिस्टीम, वायरलेस फोन चार्जर, पुश-बटण, स्टार्ट/स्टॉप बटण आणि तापमान नियंत्रण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल. ‘पंच ईव्ही’ एका चार्जवर किमान ३०० किलोमीटर अंतर कापू शकते. हे ६०० किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच, ही १५० डीसी फास्ट चार्जरद्वारे जलद चार्ज होऊ शकते. संभाव्य किंमतीबद्दल सांगायचे तर, टाटा पंच ईव्ही १२ लाख ते १४ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करु शकता..

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *