आयक्यू कंपनी भारतीय बाजारासाठी आपला ‘आयक्यू निओ 9 प्रो’ स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने फोन कधी दाखल होईल, याची तारीख जाहीर केली आहे. कंपनी 22 फेब्रुवारीला भारतीय ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीचा हा फोन खास असेल. कारण हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 जिन 3 चिपसेटसह आणला जात आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये आपली स्वदेशी बाजारपेठ चीनमध्ये आयक्यू निओ 9 आणि निओ 9 प्रो लाँच केले होते.
‘निओ 9 प्रो’ फोन भारतात ‘निओ 9’ ची सुधारित आवृत्ती म्हणून आणला जात आहे. हा फोन 8 एमपी अल्ट्रावाइड लेन्ससह आणला जाऊ शकतो. फोनमध्ये 16 एमपी फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. कंपनी स्नॅपड्रॅगन 8 जिन 2 चिपसेटसह हा फोन आणू शकते. ‘आयक्यू निओ 9’ प्रो कंपनी 6.78-इंच डिस्प्ले, 1.5 के रिझोल्यूशन आणि 144हर्टझ रिफ्रेश रेटसह आणू शकते. या फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 512 जीबीपर्यंत युएफएस 4.0 स्टोरेज असू शकते. कंपनी अँड्रॉईड 14 आधारित फन टच ओएस 14 सह हा फोन आणू शकते.