विद्या बालनचा दो और दो प्यार

विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांची अनोखी जोडी एका चित्रपटात चाहत्यांना पहायला मिळणार आहे. बॉलिवूडला महिला सक्षमीकरणाशी संबंधित अनेक चित्रपट देणाऱ्या विद्या बालनच्या चित्रपटाची चाहते तर आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्या बालन ‘दो और दो प्यार’ द्वारे चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. या अभिनेत्रीने ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘भूलभुलैय्या’ सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीच्या या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात विद्याशिवाय अभिनेत्री इलियाना डिक्रूझही दिसणार आहे. विद्या बालन व प्रतीक गांधी तर इलियाना डिक्रूझ व सेंधील राममूर्ती अशा जोड्या यात दिसणार आहेत. गुहू ठाकुर्ता दिग्दर्शित ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट फार दूर नाही. यावर्षी २९ मार्चला तो प्रदर्शित होणार आहे. या नवीन चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *