सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • रंगकाम

रंगकाम

by सह्याद्री मराठी वृत्त 18 January 2024 0 Comments
18Jan, 2024

वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी, हे साहित्य नेण्यासाठी वाहन याची गरज असते. रंगकाम करण्यासाठी आधी या कामाचे ज्ञान मिळविणे फार गरजेचे आहे. रंगांचे ज्ञान असायला हवे. अलीकडे भिंतींवर आकर्षक नक्षीकाम करुन रंग अधिक उठावदार केला जातो. त्यामुळे या व्यवसायातील नवनवे तंत्रज्ञान वेळीच आत्मसात करायला हवे. रंगांचे प्रकार अर्थात रंगांचे ज्ञान आपण शिकायला हवे. रंगकाम सुरू करण्यात मोठा अडथळा येत नाही. रंगकाम करणाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी फार काळ घालवावा लागत नाही. याचा अर्थ आपल्याला जेव्हा जेव्हा कारागिरांची आवश्यकता लागेल तेव्हा असे रंगकाम करणारे सहज मिळू शकतात.

घरांच्या रंगकामाची बारीकसारीक कौशल्ये काम करता-करताही आपण शिकवू शकता. रंगकाम व्यवसाय सुरू करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याची लवचिकता हे आहे. म्हणजे, आपण आपली एखाददुसरी लहानशी नोकरी करुनही हे काम करु शकता. आपण हे काम हंगामानुसार करु शकता. पावसाळ्यात रंगकाम नसते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात ही कामे बहुतांशी असतात. रंगकाम व्यवसाय करण्यासाठी इतर क्षेत्रांपेक्षा कमी खर्चिक उपकरणे देखील लागतात. पॉवरटूल्स, वेल्डिंग उपकरणे, प्लंबिंग पुरवठा किंवा इतर ओव्हरहेड-जड साहित्याऐवजी गरजेपुरते सामान वापरून आपण व्यवसायाला सुरुवात करू शकता. इतर उपकरणे, जसे की मचान, पेंट स्प्रेअर ही उपकरणे व्यवसायात जम बसू लागल्यावर घेऊ शकता.

सुतारकाम आणि प्लंबिंग यांसारख्या इतर व्यवसायांप्रमाणे घरे कशी रंगवायची हे शिकण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागत नाही. अधिक कुशल कामगार लागणार नाहीत. त्यामुळे कामगारांवर तेवढा खर्च करावा लागणार नाही. प्रत्येक बाजारासाठी हे खरे असू शकत नाही. तरीही अनेकदृष्ट्या लागू पडते. रंगकाम या व्यवसायाला फार चांगले दिवस आहेत. आधुनिकतेच्या या काळात नवनवीन सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना रंगकाम करण्यासाठी चांगल्या कारागिराच्या शोधात माणसे असतात. त्यामुळे हा व्यवसाय फायद्यातच आहे. उंच-उंच इमारती रंगविणे तेवढेच जोखमीचे काम आहे. अलीकडे रंगकामासाठी यंत्रसामग्री बाजारात उपलब्ध आहे. जसजसा व्यवसायात जम बसू लागेल तसा अशा यंत्रसामग्रीचा वापर करुन आपण आपला व्यवसाय अधिक उत्तम बनवू शकता.

Next
दक्षिण भारतातील पुंगनुर गाय
January 18, 2024
Previous
तेजश्री प्रधानचे दमदार पुनरागमन
January 17, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to रंगकाम?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !