सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • दक्षिण भारतातील पुंगनुर गाय

दक्षिण भारतातील पुंगनुर गाय

by सह्याद्री मराठी वृत्त 18 January 2024 0 Comments
18Jan, 2024

‘पुंगनुर’ ही गाईची भारताची स्वदेशी जात आहे. या आंध्रप्रदेशातील ‘पुंगनूर’ जातीच्या गाई जगातील सर्वात लहान गाई आहेत. भारतात एकूण 43 हून अधिक देशी गाई आहेत. त्यापैकी एक ‘पुंगनूर’ गाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या गाईचे प्रशंसक आहेत. भारतातील ही देशी गायीची जात नामशेष झालेल्या जातीपैकी एक आहे. ‘पुंगनूर’ ही गाय तिच्या कमी उंचीसाठी प्रसिद्ध आहे. कारण ही गाय वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्य गाईच्या दुधात ३.५ टक्के फॅट असते. ‘पुंगनूर’च्या दुधात ८ टक्के फॅट असते. या गाईचे वजन 110 ते 200 किलो असते. ती रोज दोन ते तीन लिटर दूध देते. ती एका दिवसात 5 किलोपर्यंत चारा खाते. ‘पुंगनूर’ ही गाय मुख्यतः आंध्रप्रदेशातील ‘चित्तूर’ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील ‘पुंगनूर’च्या नावावरून गाईचे नाव पडले आहे.

सध्या या गाई वाचविण्याचे काम सुरू आहे. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात लिंगमपट्टी गावात 4 एकरांवर पसरलेल्या ‘नदीपती’ गोशाळेत पुंगनूर जातीच्या 1058 गायी आहेत. सुमारे 16 वर्षांपूर्वी कृष्णम राजू यांनी एका गायीने सुरुवात केली होती. कृष्णम राजू पुंगनूर येथे गायींचे रक्षण करीत आहेत. ते म्हणतात, “पुंगनूर ही एक प्राचीन जात आहे. या लहान गाईला जास्त खायला द्यावे लागत नाही. तिचे दूधही चांगले आणि पौष्टिक असते. हळूहळू परदेशी जातीच्या आगमनाने ही जात मागे पडली. आपल्या देशातील जाती नामशेष होऊ लागल्या, त्यापैकी एक पुंगनूर होती. ही एक दुष्काळ प्रतिरोधक जाती आहे. दक्षिण भारतात लोक तिचे पालनपोषण करतात.

पशुधन लोकसंख्या-2013 नुसार, आंध्रप्रदेशात ‘पुंगनूर’ गायींची संख्या केवळ 2,772 होती. गेल्या काही वर्षांत ‘पुंगनूर’ जातीच्या संवर्धनावर काम केले जात आहे. सन 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशुगणनेनुसार, ‘पुंगनूर’ गुरांची संख्या 13275 आहे. गायींच्या सर्वात कमी संख्येबद्दल बोलायचे झाल्यास ‘बेलाही’ जातीच्या गायींची संख्या सर्वात कमी 5264 आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘पानीकुलम’, तिसऱ्या क्रमांकावर ‘पुंगनूर’, चौथ्या क्रमांकावर ‘वेचूर’ आणि पाचव्या क्रमांकावर ‘डगरी’ आहे. ‘पुंगनूर’च्या लहान आकारामुळे ही गाय अनेकांना आवडू लागली आहे. या गाईची एक जोडी 1 लाख ते 25 लाख रुपयांना विकली जाते. गाय जितकी लहान असेल तितकी तिची किंमत जास्त असते.

Next
पुस्तक मुद्रण
January 18, 2024
Previous
रंगकाम
January 18, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to दक्षिण भारतातील पुंगनुर गाय?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !