पुस्तकांची राम मंदिर प्रतिकृती

डोंबिवली येथे पुस्तक आदान-प्रदान सोहळा सुरू झाला आहे. सोमवारी येथे सुमारे म्हणून ६२,५०० पुस्तकांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. ही प्रतिकृती पाहण्यासाठी वाचकसुद्धा आवर्जून या सोहळ्यास भेट देत आहेत. यंदा या सोहळ्याचे सातवे वर्ष आहे. या सोहळ्याची यंदाची संकल्पना ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’ ही आहे. डोंबिवलीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे हा सोहळा होत आहे. भारतातील हे पहिले बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन आहे.
येथील पुस्तकांचे श्रीराम मंदिर फारच आकर्षक दिसत आहे. या मंदिराचे कळस स्थापना पूजन बुधवारी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हे मंदिर उभारण्यासाठी ३० दिवस लागले. मंदिराचा आकार ५० फूट उंच, ८० फूट रुंद आणि ४० फूट लांब आहे. दि.२८ जानेवारीपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात हा सोहळा पाहता येणार आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन १९ जानेवारीला पार पडले. या सोहळ्यास मुख्यमंत्री, इतर मंत्री, अनेक साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक उपस्थित राहणार आहेत.