सुष्मिता सेनने ‘आर्या’ च्या माध्यमातून ओटीटी विश्वात प्रवेश केला. या मालिकेचे दोन हंगाम आले आहेत. त्यानंतर सुष्मिता सेनने ‘ताली’मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारली. या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता सुष्मिता सेन पुन्हा एकदा ‘आर्या-3’मधून प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहे. ‘आर्या-3’ या वेबमालिकेचा ट्रेलर नुकताच आला आहे. या ट्रेलरने राम माधवनची वेबमालिका पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. हा ट्रेलर 2 मिनिटांचा आहे.
यात सुश्मिता सेन आपला पती गमावल्यानंतर पुन्हा एकदा हातात बंदूक घेऊन आपल्या मुलांसाठी आपल्या शत्रूंचा खात्मा करताना दिसणार आहे. ‘आर्य-3’च्या या ट्रेलरमध्ये सुश्मिता सेन दमदार ॲक्शन करताना दिसत आहे. ‘आर्य-3’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “या अप्रतिम कामगिरीची वाट पाहू शकत नाही, आतुरतेने आर्या 3 ची वाट पाहत आहे.” राम माधवन दिग्दर्शित ‘आर्या 3’ चा दुसरा भाग 9 फेब्रुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेबमालिका प्रदर्शित होणार आहे.