सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • वेचक - वेधक/
  • विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण

विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण

by सह्याद्री मराठी वृत्त 30 January 2024 0 Comments
30Jan, 2024

अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच या पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे शहरात नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिकवणी वर्गांचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भयानक सत्य मांडले. विद्यार्थ्यांच्या दफ्तरांमध्ये गुटखा पाकिटे, पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी, ई-सिगारेट आढळत असल्याचे त्यांनी उपस्थित पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील व अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

विद्यार्थी पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून शाळेत जातात. शाळेतही ही मुले नशेत असतात. काही मुले वर्गात नशेच्या गोळ्या आणून त्या अन्य मुलांना देत असल्याचे सांगितले. शाळकरी मुले अमली पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपऱ्यांमधून ई-सिगारेटची विक्री होते. शाळकरी मुलांकडे ई-सिगारेटदेखील आढळल्या आहेत. त्यामुळे पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली. याशिवाय, शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढली जात असल्याची गंभीर बाबही शिक्षकांनी मांडली.

शाळकरी मुलांचे हे व्यसनाधीन होणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या आसपास असलेल्या पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तस्कर मुलांना ड्रग्ज पुरवत आहेत. हुशार मुलेसुद्धा अजाणतेपणाने ड्रग्जकडे वळू लागली असल्याने या चर्चासत्रात केवळ चिंतेचा सूर उमटलेला दिसून आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात शाळा आणि पोलीस ठाणे यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी एका महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. असे कोणतेही प्रकार शाळेत आढळल्यास या अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. आम्हाला माहिती मिळताच नक्की कारवाई करू, अशी हमी देऊन नशेचा विळखा दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.

Next
मीरा चोप्रा विवाहगाठ बांधणार
January 31, 2024
Previous
श्री सिद्धीविनायक दर्शन सुलभ होणार
January 30, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !