सन 2023 साली अनेक सेलिब्रिटींच्या घरांमध्ये सनई वाजली. आता सन 2024 मध्येही अनेक सेलिब्रिटींच्या घरी लग्नाची घंटा वाजणार आहे. गेल्या वर्षी प्रियंका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्राने ‘आप’ नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केले. आता पुन्हा एकदा लग्नाबाबत चोप्रा कुटुंबात जल्लोषाचे वातावरण असणार आहे. ‘फेड’ फेम अभिनेत्री मीरा चोप्रा यावर्षी लग्नाच्या तयारीत आहे. ती तिच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
या अभिनेत्रीने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. यासोबतच मीरा चोप्राने एक व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर जोडला आहे, ज्यामध्ये ती लवकरच वधू होणार असल्याची पुष्टी करताना दिसत आहे. मीराने सांगितले की, तिचे लग्न मार्चमध्ये होणार आहे. लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. तिला राजस्थानमध्ये लग्न करायचे आहे. त्यासाठी राजस्थानमध्येच मोठ्या जागेचा शोध सुरू आहे. मात्र, मीराने तिच्या भावी पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हळुहळु लग्नाशी संबंधित प्रत्येक तपशील उघड करीत राहीन असेही ती म्हणाली आहे.