घड्याळ निर्मिती

घड्याळ निर्मिती उद्योगाने उच्च दर्जाच्या उत्पादनांनी जग जिंकले आहे. हा उद्योग प्रामुख्याने लक्झरी विभागात चालतो. गुणवत्तेच्या बाबतीत स्वित्झर्लंड हा क्लासिक घड्याळांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. इसवी सन पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात ‘घटिकापात्र’ अनेक शतकांपासून वापरात होते. त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी लंबकांच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो, हा शोध लावला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळे वेगवेगळ्या प्रकारची असतात. जगभरात घड्याळ उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या कार्यरत आहे.
मनगटी घड्याळे निर्मिती उद्योग हा रसायने आणि फार्मास्युटिकल्स उद्योग आणि यंत्रसामग्री क्षेत्राच्या मागे होता. दरवर्षी निर्यात होणाऱ्या 16 दशलक्ष मनगटी घड्याळांपैकी निम्मी घड्याळे आशिया आणि उरलेली अर्धी घड्याळे युरोप आणि अमेरिकेत जातात. बहुतेक घड्याळे अमेरिका आणि चीनला विकली जातात. घड्याळे निर्यातीमध्ये सर्वात मोठा वाटा उचलतात. स्वित्झर्लंड हा घड्याळांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. त्याने हाँगकाँग आणि चीनपेक्षाही लक्षणीय कामगिरी केली आहे. हा घड्याळ उद्योग लाखो लोकांना रोजगार देतो. विक्रीतून अब्जावधींचे उत्पन्न मिळवतो.
घड्याळ बनवण्याचा उद्योगाचे मूळ पाहिल्यास ते इसवी सन सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पोहोचते. जिनिव्हामध्ये जेव्हा जीन कॅल्विनने दागिने घालण्यास मनाई केली, तेव्हा या प्रदेशात काम करणाऱ्या सोनार आणि ज्वेलर्सनी त्यांचे लक्ष आणि कौशल्य घड्याळनिर्मितीकडे वळवले. घड्याळ निर्मात्यांनी जागतिक घड्याळ निर्मिती उद्योगावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पहिले मनगटी घड्याळ सन 1926 मध्ये तयार केले गेले. त्यानंतर क्वार्ट्ज आणि वॉटरप्रूफ घड्याळे यासारखी तांत्रिकदृष्ट्या प्रगत घड्याळे आली. सन 1970 आणि सन 1980 च्या दशकात बॅटरीवरील मनगटी घड्याळांचा उदय झाला. कठोर स्पर्धेमुळे मनगटी घड्याळनिर्मिती उद्योग काहीसा संकटात सापडला होता; मात्र, प्रगत तंत्रज्ञानामुळे आजही घड्याळनिर्मिती उद्योग चांगला जम बसवून आहे.