सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • महाराष्ट्र/
  • क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडू घडायला हवेत

क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडू घडायला हवेत

by सह्याद्री मराठी वृत्त 9 February 2024 0 Comments
09Feb, 2024

क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडायला हवेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारी पुढची पिढीही तितकीच सक्षम आणि तंदुरूस्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा, युवा मेळावे आयोजनासाठी प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, शासनाच्या सन 2012 च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता क्रीडा विभागाला शासनाकडून 2985.29 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासनाकडून मिळालेला निधी 1 कोटी असून त्यामध्ये या संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचा 9 कोटी निधी उपलब्ध करून दिला. या तालुका क्रीडा संकुलास बांधण्यासाठी 4 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे.

ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रवींद्र पाठक, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसीलदार युवराज बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता दीक्षित यांनी केले. क्रीडा उपसंचालक फरताडे यांनी आभार व्यक्त केले

Next
फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन
February 9, 2024
Previous
निसर्ग पर्यटन विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
February 9, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडू घडायला हवेत?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !