सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • महाराष्ट्र/
  • छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन

by सह्याद्री मराठी वृत्त 14 February 2024 0 Comments
14Feb, 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय-मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे या महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. प्रारंभी सकाळी क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ग्रंथदालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहाय्यक संचालक ग्रंथालय सुनील हुसे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कैलास आतकरे, राजशेखर बालेकर, समता दर्शन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा वासाडीकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथप्रेमींची उपस्थिती होती.  ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ऋषिकेश कांबळे म्हणाले की, मनाची जोपासना ग्रंथ करत असतात. जीवनाचे संकल्प करण्याचे आणि ते प्रत्यक्ष आणण्याचे सामर्थ्य ग्रंथामधून व्यक्तीला मिळत असते. जीवन विकासाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. संत वाड.मयाने परोपकाराची, समतेची भावना आपल्या साहित्यातून वाढीस लावली. अनुभवसिद्धता मानवाला वाचनातून येत असते. अभिव्यक्तीसाठी ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

बुधवार दि.१४ रोजी सकाळी 11 वा. ‘वाचन संस्कृती संवर्धनात माझा खारीचा वाटा’ या विषयावर अध्यक्ष डॉ. दादा गोरे, दै.सकाळचे मराठवाडा आवृत्ती संपादक संतोष शालीग्राम, लेखाधिकारी शरद भिंगारे, साहित्यिक डॉ. ललित अधाने, साईबाबा वाचनालयाचे सचिव दुष्यंत आठवले, प्रकाशक भास्कर सरोदे विारमंथन करतील. दुपारी 2 वा. परिसंवाद होईल. ‘सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासासाठी विविध योजना’ हा विषय असेल. दुपारी 4 वा.समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. धर्मराज वीर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची उपस्थिती असेल.  या ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Next
बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास
February 14, 2024
Previous
ठाण्यात ई बसगाड्यांचे लोकार्पण
February 14, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !