संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी 11 ‘शक्ती’ युद्ध प्रणाली आणि संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 2,269 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ‘शक्ती’ भारतीय नौदलाला फ्रंटलाइन सपोर्ट प्रदान करेल. ही प्रणाली युद्धनौकांवर बसवली जाईल. ही प्रणाली स्वदेशी पद्धतीने डिझाइन, विकसित आणि उत्पादित केली आहे.
शक्ती यंत्रणा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणे अचूकपणे रोखण्यात आणि घनदाट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणात प्रतिकार करण्यास सक्षम आहेत. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय नौदलासाठी स्वदेशी रीतीने संबंधित उपकरणे डिझाईन व विकसित केली आहेत. 11 शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालीच्या खरेदीसाठी 13 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे बीईएलशी करार करण्यात आला आहे. या खरेदीसाठी 2,269.54 रुपये खर्च येईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे 155 हून अधिक उद्योग भागीदारांना चार वर्षांत 2.5 लाख दिवसांचा रोजगार निर्माण होईल. अशा प्रकारे ते आत्मनिर्भर भारताच्या व्हिजनला पुढे नेतील.