चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग यांचा राजीनामा

चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी चीनच्या संसदेचा राजीनामा दिला आहे. किन गँग यांना गेल्या वर्षी परराष्ट्रमंत्री पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. वांग यी यांना पुन्हा परराष्ट्र मंत्री बनविण्यात आले होते. किन गँग हे बडतर्फ झाल्यापासून बेपत्ता होते. चीनच्या राष्ट्रीय विधिमंडळाच्या वार्षिक अधिवेशनापूर्वी किन यांनी राजीनामा दिला. हे अधिवेशन ५ मार्चपासून होणार आहे.

चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’च्या वृत्तानुसार, नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस ही सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्याला मान्यता देते.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *