महिला दिनी तेरव येणार

दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका संघर्षमय वृत्तीच्या महिलेचे जीवन एका चित्रपटातून पहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ८ मार्चला हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘तेरव’ ! या चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आत्ताच प्रदर्शित करण्यात आला

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला संकटांना न घाबरता लढतात, हे या चित्रपटात दाखविले आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, मधुभैया जोशी, श्रद्धा तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांच्या भूमिका केल्या आहेत. दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज दिला आहे. चित्रपटाचे मुख्य गाणे ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. नितीन गडकरी यांनी या चित्रपटाचे तोंडभर कौतुक केले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला . यावेळी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धा तेलंग, देवेंद्र लुटे उपस्थित होते .

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *