गुडघे व कोपरांची सुंदरता

चेहरा आणि ओठांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी ‘एक्सफोलिएशन’चा वापर केला जातो. या प्रक्रियेत मृत त्वचा काढून टाकली जाते. यामुळे त्वचा अतिशय चमकदार, तुकतुकीत दिसते. निरोगी आणि सुंदर राहते. याशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मात्र, अनेकदा आपण आपल्या शरीरातील कोपर, गुडघे याकडे लक्ष देत नाही. मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे त्यांचा रंग अनेकदा काळे पडतो. त्यामुळे त्या शरीराच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या दिसतात. चांगल्या दिसत नाहीत. त्वचेला उजळपणा देण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत.

रासायनिक उत्पादने उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून त्वचेच्या मृत पेशी सहज स्वच्छ केल्या जाऊ शकतात. त्यातही घरगुती उपाय करून पाहणे आणि नैसर्गिकरित्या ‘एक्सफोलिएट’ करणे हा एक चांगला उपाय आहे.  गुडघे आणि कोपर उजळविण्यासाठी साखर आणि मध उकळून घ्या. यासाठी चूर्ण साखर घ्यावी. ही अवयव स्वच्छ करण्यासाठी बनवलेली एक विशेष प्रकारची साखर असते. ती मधामध्ये मिसळावी. त्याने गुडघे आणि कोपरांवर मसाज करावे. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. त्वचा स्वच्छ राहण्यासही मदत होते. एक चमचा दही, एक चमचा ओट्स आणि थोडासा मध एकत्र करून मिसळावे.

चेहरा, कोपर, गुडघ्यावर लावावे. अर्ध्या तासानंतर धुवावे . ओट्स आणि दुधाचा स्क्रब बनवून आंघोळीच्या अर्धा तास आधी गुडघे व कोपरास लावावा. नंतर आंघोळ करावी. कच्च्या कोरफड जेलमध्ये घरगुती जेल किंवा लोशन थोड्या प्रमाणात मिसळावे. ते कोपर तसेच गुडघ्याना लावावे. काही वेळाने धुवावे. धुण्याचा सोडा त्वचेला चमकण्यास मदत करतो. यासाठी एक चमचा गोड सोड्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून लावावे. अधिक प्रभावासाठी आठवड्यातून दोनदा लावावे. अलगद हातांनी मसाज करावे.  घासू नये.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *