वनप्लस 11 आर स्मार्टफोन

वनप्लस 11 आर स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कंपनी या फोनवर 3000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. वनप्लसचा हा फोन गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. ‘वनप्लस 11 आर’ हा स्मार्टफोन कंपनीने 39,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. आता कंपनी या वन प्लस फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटवर 2000 रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन 37,999 रुपयांना खरेदी करता येईल.

हा फोन 16जीबी + 256जीबी व्हेरिएंट 44,999 रुपयांना सादर करण्यात आला होता. हा फोन आता 41,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनवर आयसीआयसीआय बँक आणि वन कार्ड क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर वन प्लस वेबसाइट आणि ॲमेझॉन इंडिया या दोन्हींवर उपलब्ध आहे. या फोनमध्ये वन प्लस 11आर 5जी स्मार्टफोनमध्ये 120हर्टझ रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे.

हा फोन 16जीबी रॅम आणि 256जीबी पर्यंत स्टोरेजसह ऑफर करण्यात आला आहे. वनप्लस 11आर 5जी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 एमपी प्राथमिक कॅमेरा आहे,. त्यासोबत 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स प्रदान केले आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *