आर्यनचे दिग्दर्शन

शाहरुख खानचा लाडका आर्यन खान गेल्या काही काळापासून त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. तो दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. ‘स्टारडम’ या वेबमालिकेमधून तो दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश करणार आहे. आर्यन खानच्या या वेब मालिकेमध्ये शाहरुख खानपासून बॉबी देओल आणि करण जोहरसारखे अनेक तगडे अभिनेते दिसणार आहेत. पहिल्यांदाच स्वतः आर्यन खान त्याच्या ‘स्टारडम’बद्दल बोलला आहे. आर्यन पहिल्यांदाच त्याचे वडील शाहरुख खान असलेल्या वेबमालिकेमध्ये दिग्दर्शन करणार आहे.

अलीकडेच पहिल्यांदा ‘जीक्यू मॅगझिन’शी बोलताना आर्यन खानने शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. आर्यन म्हणाला की, माझ्यासाठी हा आनंदाचा आणि शिकण्याचा अनुभव आहे. लोक नेहमी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलतात, परंतु ते स्वतः अनुभवणे आश्चर्यकारक होते. त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान आहे, ज्यामुळे माझे काम आणखी सोपे होते. अशा काही गोष्टी होत्या ज्या समजायला मला खूप वेळ लागत होता, पण त्या त्यांच्यासाठी पूर्णपणे सोप्या होत्या. ” आर्यन खानने जाहिरात चित्रीकरण आणि वेब मालिका या दोन्हींचे दिग्दर्शन केले आहे.

आर्यन म्हणाला, “ मी केवळ जाहिरातींचे चित्रीकरणच करत नाही, तर त्याशिवाय मला फोटोशूटचीही काळजी घ्यावी लागते. मी त्यात क्रिएटिव्हपणे गुंतलो आहे, पण लॉजिस्टिकमध्ये तितकासा सहभाग नाही. दुसरीकडे, एक दिग्दर्शक म्हणून मला प्रत्येक तपशील, प्रत्येक शॉट आणि प्रत्येक कोनाकडे लक्ष द्यावे लागते.” आर्यन खान याची आगामी ‘स्टारडम’ मालिका सहा भागांची असणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *