‘स्वातंत्र्यवीर सावरकर: अ सिनेमॅटिक ट्रिब्यूट टू इंडियाज अनसंग हिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजमाध्यमावरदेखील या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा होताना दिसत आहे.
चित्रपटगृहात २२ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण आजही त्यांच्याबद्दल लोकांना फार कमीच माहिती आहे. या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची न पाहिलेली बाजू बघायला मिळणार आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखडे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता अमित सियाल देखील या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डा यांने वीर सावरकरांची भूमिका उत्तम वठवल्याचे दिसत आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.