श्रेयसच्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटाची घोषणा

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रेयसच्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाचा टीझरही प्रसारित करण्यात आला आहे.

‘ओम शांती ओम’ आणि ‘गोलमाल अगेन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटणारा अभिनेता श्रेयस तळपदे याचा हा पुढील चित्रपट आहे. हृदयविकाराच्या झटक्यातून स्वस्थ झाल्यानंतरचा या अभिनेत्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

‘लव्ह यू शंकर’ चा टीझर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. राजीव एस. रुईया दिग्दर्शित ‘लव्ह यू शंकर’ हा ॲनिमेशन चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. यात श्रेयस तळपदे याच्यासह तनिषा मुखर्जी, संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुनीता देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ही कथा एका ८ वर्षाच्या मुलाची आणि भगवान शिवची पुनर्जन्मावर आधारित आहे. ही कथा एका मुलाभोवती फिरते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *