श्रेया घोषालच्या आवाजाने आणि तिच्या सौंदर्याने देखील चाहत्यांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका ही आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. अहवालानुसार, श्रेया घोषालकडे एकूण १८० ते १८५ कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती आहे. संगीतरसिक तिचे गाणे अगदी आवडीने ऐकताना दिसतात.
श्रेया घोषाल एका गाण्याचे २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते. काही दिवसांपूर्वी श्रेयाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडींग कार्यक्रमात देखील गाणे गायले होते. तिच्या गाण्याने पाहुण्यांना थिरकण्यास भाग पाडले होते.
श्रेया ‘सारेगमप’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाने तिला भरभरुन दिले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना तिचा आवाज आवडला. त्यांनी तिला ‘देवदास’ या सिनेमातील गाणी गाण्याची संधी दिली. या सिनेमाच्या माध्यमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजपर्यंत तिने २०० हून अधिक गाणी गायली आहेत.