स्पृहा जोशीची नवी मालिका

‘उंच माझा झोका’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून दमदार अभिनयाचे दर्शन् घडविणारी स्पृहा पुन्हा एकदा एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे नाव ‘सुख कळले’ असे असून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जोडला आहे. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख असणार आहे.

या मालिकेच्या प्रोमोमध्ये स्पृहा जोशी एका रिक्षामधून उतरते. तिच्यासोबत सागर देशमुख असून दोघेही चालत असताना अचानक स्पृहाची चप्पल तुटते. त्यावेळी सागर त्याच्या पायातील चप्पल काढून स्पृहाला घालण्यास देतो. तिची चप्पल एका हातात घेतो.

एकंदरीत स्पृहा आणि सागरचा सुखी संसार या मालिकेत दिसणार असल्याचा अंदाज आहे.
ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिक आनंदले आहेत. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही कलाकार प्रथमच एकत्र येत आहेत. प्रोमोमधील ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी प्रेक्षकांना आवडली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *