माजोर्डा

माजोर्डा समुद्रकिनारा हा गोव्यातील एक भेट देण्यासाठी सर्वोत्तम किनारा आहे. पणजीपासून या समुद्रकिनाऱ्याचे अंतर 28 किमी आहे. या किनाऱ्यावर जाण्यासाठी दुचाकी व कारने जाऊ शकता. या समुद्रकिनाऱ्यावर अनेक शॅक आणि सनबेड असलेली रेस्टॉरंट्स आहेत. या किनाऱ्यावर पर्यटक बोट राईडचा आनंद घेऊ शकतात. नौकेतून फिरताना समुद्राच्या पाण्यावर फिरताना अनेक पक्ष्यांना पाहता येते. आपण भाग्यवान असाल तर तुम्हाला येथे डॉल्फिनचेही दर्शन्‍ घडू शकते. येथून ‘वडिलोपार्जित गोवा संग्रहालय’ फक्त 10 किमी. अंतरावर आहे. येथे एक रेस्टॉरंट देखील आहे. याच परिसरात सोळाव्या शतकातील ‘मॉंटे हिल चॅपल’ पहायला मिळेल. जे सामान्यतः पर्यटकांना माहित नाही. पण जर आपण माजोर्डाच्या आसपास असाल तर हे एक सुंदर ठिकाण आहे.

या किनाऱ्यावर पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग असे काही रोमांचक खेळ खेळू शकता. येथे एक एक लहान बाजार आहे. तेथे मसाले, कपडे आणि अन्य सामान मिळेल. तसेच येथे अनेक बेकरीही आहेत. माजोर्डाच्या आसपास सर्वत्र पब व क्लब आहेत. येथे फिरण्यासाठी रात्रीची वेळही चांगली आहे. येथे संगीत रजनींचे आयोजन केले जात असत. रात्रीच्या वेळी बरेच पर्यटक नृत्याचा आनंद घेताना दिसतात. येथे गेल्यावर किनाऱ्यावरुन सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे चुकवू नका. कारण हा समुद्रकिनारा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य घडविणारा म्हणून ओळखला जातो!

हा किनारा शहरापासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी, गोव्यातील कोठूनही समुद्रकिनाऱ्यावर जाणे अगदी सोपे आहे. तुम्हाला स्वतःला गाडी चालवायची असेल किंवा टॅक्सी घेऊन जायचे असेल तर राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शहराला सेवा देणारे प्राथमिक विमानतळ आहे. गोवा विमानतळ आणि माजोर्डा दरम्यान सुमारे 29 किलोमीटर अंतर आहे. पणजीहून थेट माजोर्डा किनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्ही टॅक्सीचा वापरही करु शकता.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *