सॅमसंगने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन ‘एस24’ सीरीज बाजारात आणली आहे. हे फोन त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे खूप चर्चेत आले आहेत. तथापि, मागील वर्षी लाँच केलेली कंपनीची मालिका म्हणजे गॅलॅक्सी एस 23 देखील अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येते. या मालिकेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नाईट मोड कॅमेरा, जो कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ता देतो. ॲमेझॉन हा फोन अतिशय स्वस्त किंमतीत लिस्ट करीत आहे. ॲमेझॉनने हा फोन फक्त 51,989 रुपयांमध्ये ठेवला आहे. हा फोन 79,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. म्हणजेच ग्राहकांना 25,000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
याशिवाय सिटीबँकच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूटही मिळू शकते. फोनमध्ये 6.1 इंच डायनॅमिक अमोल्डेड 2 एक्स डिस्प्ले आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ग्लास आणि मेटल बिल्डसह कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम इन-हँड फील मिळतो. ज्यामध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी पर्यंत स्टोरेज आहे. गॅलॅक्सी एस 23 मध्ये ट्रिपल-कॅमेरा आहे. यात 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10एमपी टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12एमपी फ्रंट कॅमेरा आहे.