‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’ने आपल्या सदस्यांना एक मोठे आश्चर्य दिले आहे. ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’ने एकाच वेळी 69 चित्रपट आणि वेबमालिकेची घोषणा केली. काहींचे शीर्षक जाहीर झाले असून काहींचे चित्रीकरण सुरू होणार आहे. असे फार कमी चित्रपट आहेत ज्यांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. जे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत किंवा प्रदर्शित होणार आहेत त्यात सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘योद्धा’ आणि शाहिद कपूर-क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ यांचा समावेश आहे.
या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. सहसा, चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 4-8 आठवड्यांच्या आत ओटीटीवर येऊ लागतात. पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे दिग्दर्शित ‘योद्धा’ हा चित्रपट 15 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली आहे, जो स्पेशल फोर्सचा सदस्य आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनची जोडी ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ मध्ये पहिल्यांदाच पडद्यावर दिसली आहे. हा एक सायन्स फिक्शन रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये क्रितीने रोबोची भूमिका केली होती. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.