सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • हस्तकला

हस्तकला

by सह्याद्री मराठी वृत्त 21 March 2024 0 Comments
21Mar, 2024

हस्तकलेचे उद्योग हे प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. आुधनिक काळातही हस्तकलेच्या वस्तू भाव खाऊन जातात. भरतकामापासून लाकूडकामापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश यात होतो. अभ्यास सांगतो की, आपल्या हातांनी काम केल्याने मानसिक आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. हस्तकला मेंदूला चालना देते. माणसाच्या क्रियाकलापांमध्ये विविधता आणते. जे संगणकावर काम करतात त्यांची सर्जनशीलता वाढविण्यास मदत करते. तणाव आणि चिंता कमी करू शकते.

हस्तकलेचे उद्योग करणारी माणसे आपली अंगभूत कला अशा पद्धतीने जोपासतात, ज्याद्वारे आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ते निर्माण करतात. आपल्या उत्पादनात विविधता आणतात. आपली उत्पादने आकर्षक बनवतात. ऑनलाइन, ऑफलाईन हस्तकला मेळाव्यांमध्ये ते सहभागी होतात. आपली उत्पादने शक्य तिथे विक्रीसाठी ठेवतात. सगळ्यात महत्वादनचे म्हणजे आपली आवड उत्पादनांमध्ये परिवर्तित करतात. त्यांची उत्पादने बनवायची आणि विक्री करायची यादी ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय उत्पादनांवर, हस्तकला स्त्रोतांकडून आलेले अंदाज आणि ट्रेंडिंगवर आधारित असते. हस्तकलेचे उद्योग प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करुन घेतात. याठिकाणी त्यांना हस्तकेलेल्या वस्तुमंध्ये विशेष अभिरुची असणारे अनेक ग्राहक भेटतात.

नवीन युगातील कल्पकतेने केली जाणारी कागदाची फुले बनविण्याची संकल्पना अलिकडे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ही एक फलदायी कल्पना आहे. सन 2030 पर्यंत या उद्योगातून होणारी उलाढाल 414 डॉलर्स अब्जच्या वर जाण्याची अपेक्षा आहे. विवाहसोहळा तसेच अन्य समारंभांसाठी कागदी फुलांचा वापर केला जातो. कागदाची फुले बनविण्याची सर्वात सोपी कलाकृती आहे. या उद्योगाचा प्रारंभ करण्यासाठी अगदी कमी खर्चाची आवश्यकता असते. ब्रिटनी वॉटसन जेप्सन हिने या उद्योगात स्वत:ची कारकीर्द तयार केली. ब्रिटनीच्या कागदी फुलांच्या कलाकृती विशेष लोकप्रिय ठरल्या. सुरुवातीला तिला अनेक अडचणी आल्या; परंतु आता ती इतरांना घरबसल्या किट विकते. मुलांसाठी किंवा प्रौढांसाठी अशा वेगवेगळ्या कलाकृती बनविता येऊ शकतात.

हस्तकलेमध्ये वनस्पती आणि वनस्पतींचे सामान विकणाऱ्या उद्योगही फार महत्वागवचे आहेत. मातीच्या कुंड्यांची गरज नेहमीच असते. या भांड्यांसाठी भट्ट्या लागतात. वनस्पतीच्या कुंड्या चिकणमाती किंवा सिमेंटपासूनही बनवता येतात. रॅचेल अकोस्टा हिने तिची शास्त्रज्ञाची नोकरी सोडली. तिचा मातीकामाचा छंद करिअर म्हणून जोपासला. तिने डिनरवेअर आणि साबण डिशेस यांसारख्या बऱ्याच वस्तूंसोबत सिरॅमिक वनस्पतींची भांडी आणि फुलदाण्या बनवून विक्रीस सुरुवात केली. मातीची भांडी बनवणे आणि विक्री करणे ही अधिक आव्हानात्मक हस्तकलेपैकी एक आहे. अशा हस्तकलांना आज मोठा वाव आहे.

Next
मटका किंग
March 22, 2024
Previous
सॉस निर्मिती
March 21, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to हस्तकला?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !