नागराज मंजुळे यांची पहिली पहिली वेबमालिका ‘मटका किंग’ही ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने नव्या वेब मालिकांची आणि चित्रपटांची घोषणा केली. त्यात या वेबमालिकेचा समावेश आहे.
या वेबमालिकेची निर्मिती रॉय कपूर फिल्मस, आटपाट आणि एएसएमआर प्रॉडक्शनकडून केली जाणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सेजवानी आणि आशिष आर्यन हे या वेबमालिकेचे निर्माते आहेत लेखन अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी केले आहे. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा या वेब मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मुंबईतील कापसाचा व्यापार करणारा एक व्यक्ती मटका आणि जुगाराचा व्यवसाय सुरू करून त्यातून एक मोठे विश्व तयार करतो, हे या मालिकेमधून पहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे यांच्या या वेबमालिकेमध्ये अभिनेते विजय वर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘मटका किंग’ या वेब मालिकेमधून ते ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही वेबमालिका मुंबईतील कुप्रसिद्ध ‘मटका किंग’ रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.