‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर रसिकांना निलेश साबळे आणि भाऊ कदम या धमाकेदार जोडीची आठवण येत होती. त्यांना पुन्हा हसवताना पहायचे होते. आता रसिकांसाठी एक आनंदवार्ता आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा विनोदी कार्यक्रम घेऊन येत आहेत. हा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या विनोदी कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम यांच्या जोडीने ओंकार भोजने देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील तिघांचेही लूक समोर आले आहेत.
या नव्या कार्यक्रमाची घोषणा ऐकून प्रेक्षकांना देखील सुखद धक्का बसला आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि अभिनेता रोहित चव्हाण हे कलाकार दिसणार आहेत. अलका कुबल आणि भरत जाधव हे दोन दिग्गज कलाकार पाहुणे परीक्षक असतील.