नितेश तिवारींच्या ‘रामायण’ ची घोषणा झाल्यापासून रणबीर कपूर श्रीरामच्या भूमिकेत कसा दिसणार, याची चित्रपट चाहत्यांमध्ये उत्कंठा आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील माता सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीचे नाव पुढे आले आहे. पात्रांची नावे समोर आली असली तरी त्यांचे लूक समोर आलेले नाहीत. आता अभिनेत्री आकृती सिंगने सेटवरील एक छायाचित्र समाजमाध्यमांवर जोडले आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, ‘रामायण डे 1.’ या छायाचित्रामध्ये व्यक्तीची पाठ दिसत आहे, चेहरा नाही. अशा परिस्थितीत हा फोटो रणबीर कपूरचा आहे की अन्य कोणाचा हे सांगणे अवघड आहे.
‘रामायण’ चित्रपटासाठी भरत आणि कौसल्याच्या भूमिकांसाठी काही कलाकारांची नावे पुढे आली आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे रामचा भाऊ भरतची भूमिका साकारू शकतो. त्याचवेळी कौसल्याच्या भूमिकेसाठी टेलिव्हिजन अभिनेत्री इंदिरा कृष्णनचे नाव पुढे आले आहे. याशिवाय रावणाची पत्नी मंदोदरीच्या भूमिकेसाठी साक्षी तन्वरच्या नावाची चर्चा आहे.