सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन

सुनील ग्रोव्हर ‘द ग्रेट ग्रँड इंडियन कपिल शो’ सह कॉमेडी शोच्या जगात जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्यांच्या ‘डॉक्टर गुलाटी’ला पुन्हा एकदा विनोद करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नव्या शोमध्ये सुनील ग्रोव्हर नव्या लूकमध्ये दिसणार आहे. ‘ग्रेट इंडियन कपिल शो’ अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन. 7 वर्षांनंतर त्याची आणि कपिल शर्माची रॉकिंग केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. सुनील ग्रोव्हरच्या पुनरागमनामुळे तो नव्या शोमध्ये नवीन व्यक्तिरेखा साकारणार की, त्याच्या जुन्या आणि प्रसिद्ध पात्रांमध्ये रंग भरणार याविषयी गुढ कायम आहे.

सुनील ग्रोव्हर यांची डॉ. ‘मशूर गुलाटी’ची भूमिका सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ’50-50 हॉस्पिटल’ चालविणारे डॉ. मशूर गुलाटी त्यांची मुलगी सरलापेक्षा सुंदर मुलींना आकर्षित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. सुनील ग्रोव्हरने हे प्रतिष्ठित पात्र इतक्या प्रामाणिकपणे साकारले की जणू ते खरे पात्र आहे. या व्यक्तिरेखेनंतर सुनील ग्रोव्हरला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्याची ‘डॉ. गुलाटी’ भूमिका प्रसिद्ध आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *