गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘होय महाराजा’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून अभिनेता प्रथमेश परबने समाजमाध्यमांवरून ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या नावामुळे चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टीने केले आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी लिहिले आहे. गुरु ठाकूर यांनी गीते लिहीली असून चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. फाईट मास्टर मोझेस फेर्नांडीस यांची ॲक्शन या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केले आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.