दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला जबरदस्त, खतरनाक खलनायक दिले. या सर्वांमध्ये आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत असा तात्या विंचू ! हा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ ची घोषणा केली आहे. या घोषणेचे प्रेक्षकांनी सवागत केलेले दिसत आहे. अर्थातच, त्यांची उत्कंठा वाढलेली आहे.
‘राजश्री मराठी’ च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महेश कोठारे आणि तात्या विंचू यांचे छायाचित्र जोडले असून दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. समाजमाध्यमांवर ‘झपाटलेला ३’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर चाहते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत बुडालेले दिसत आहेत. ‘लक्ष्या मामा शिवाय मज्जा नाही’ अशी कमेंट केली आहे.
‘झपाटलेला ३’ मध्ये कोण दिसणार आहेत,कथा काय असेल, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.