अभिनेता विक्रांत मेस्सी याचा ’12’थ फेल’ हा चित्रपट नवा विक्रम प्रस्थापित करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून आला. आता हा चित्रपट एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा हा चित्रपट एक-दोन नव्हे तर तब्बल २० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री विक्रांत मेस्सी याच्यासह अभिनेत्री मेधा शंकर हिची भूमिका आहे. विधू विनोद चोप्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट बरोबरच परदेशातही आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज झाला आहे.
विक्रांत मेस्सीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची भूमिका साकारली होती, जे गरिबीतून बाहेर पडून आयपीएस अधिकारी झाले होते. हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.